25.4 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

0
23
गडचिरोली ,६ जुलै: भरधाव वेगाने जाणाNया ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने त्याचा  जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ६ जुलै रोजी आष्टी-चामोर्शी मार्गावरील येनापूर येथील आरोग्य केंद्रासमोर घडली.  वासुदेव याडे असे मृतक दुचाकी स्वाराचे नाव असून तो लक्ष्मनपूर येथील रहिवाशी आहे.
 प्राप्त माहितीनुसार  वासुदेव झाडे हा दुचाकीने येनापूर बसस्थानकाकडे जात होता.  दरम्यान विरूध्द दिशेने येणार्या सीजी/०७/८५१२ क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ट्रकने दुचाकीसह वासुदेव झाडे याला काही अंतरावर फरफटत नेले. झाडे याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखातप होवून  जागीच मृत्यू झाला. आष्टी पोलीसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.