रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध षडयंत्राची शक्‍यता : महादेव जानकर

0
11

बुलडाणा,दि. 6  : शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर परभणीच्या गंगाखेड पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री 11 वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी हा प्रकार म्हणजे रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध षडयंत्र असल्याची शक्‍यता वर्तवली आहे.बुलढाणा जिल्हयाच्या दौऱ्यावर असतांना गुरुवारी ते शेगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. पाच राष्ट्रीयकृत बॅंका आणि एका खासगी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन रत्नाकर गुट्टेंच्या गंगाखेड शुगर ऍन्ड एनर्जी लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याने सहा जिल्ह्यातल्या एकूण 15 हजार शेतकऱ्यांच्या नावे तब्बल 328 कोटींचं कर्ज उचलल्याचं समोर आले आहे. त्यामध्ये बुलढाणा अकोला वाशीम जिल्हयातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या शेतकऱ्यांचे बोगस कागदपत्रं जोडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आले आहे. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे पहिल्या फळीतील नेते आहेत. “रत्नाकर गुट्टे यांच्या मागे षडयंत्र रचल्या जात आहे. चौकशी अंती खरं ते बाहेर येईल आणि त्यानुसार कारवाई होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खरात,सुनील मतकर,विनोद वणारे, नंदकुमार तुपकर, शेख युसूफ, सतिष हांडे आदींची उपस्थिती होती.