शिक्षकांनी पाल्यांना शिकवावे जि.प.शाळेत जिबीचा ठराव,आदेश नव्हे

0
11

गोंदिया,दि.06: गोंदिया जिल्हा परिषदेच्या गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत(जिबी) जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास कायम राहावा व पटसंख्या कमी होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षण द्यावे असा ठराव पारीत करण्यात आला.सर्वसाधारण सभेने हा ठराव पारीत केला असला तरी अद्यापही त्यासंबधीचा अधिकृत आदेश शिक्षण विभागाने काढलेला नाही.जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये होणारी दिवसेदिवसची कमी पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांची संख्या रोखण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांचा जि.प.शाळेच्या शिक्षकांनी आपली मुलेही तिथे शिकवली तर विश्वास कायम राहिल या हेतूने हा ठराव घेण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती पि.जी.कटरे यांनी दिली.परंतु त्यासंबधीचा अधिकृत असा आदेश अद्यापही शिक्षण विभागाने काढलेला नसल्याचेही सांगितले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या पाल्यांना झेडपीच्या शाळांमध्ये शिकवले नाही, तर त्यांचे घरभाडे भत्ता आणि इतर सुविधा दिल्या जाणार नाही असा उल्लेख ठराव करतांना करण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुमारे 4000 च्या जवळपास शिक्षक सध्या कार्यरत आहेत. ज्या पदाधिकारी व सदस्यांनी हा ठराव घेतला त्यांचे अभिनंदन करण्यात येत असले तरी त्यांनी फक्त शिक्षकांनाच टारगेट का केले.जिल्हा परिषदेचे सदस्यांचे पाल्य,सीईओ,डेप्युटी सीईओ यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी,पदाधिकारी यांच्या पाल्यांच्या बाबतीत मात्र ठराव घ्यायला सदस्य विसरल्याचे दिसून येते.