26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ नप प्रशासकिय अधिकारी राणेला मारण्याची धमकी

नप प्रशासकिय अधिकारी राणेला मारण्याची धमकी

0
18

गोंदिया,दि.१४- गोंदिया नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी राणे हे आपल्या कार्यालयात सकाळी ११ वाजता दरम्यान काम करीत असताना त्यांच्या कक्षात येऊन नगराध्यक्षाचे स्वीय सहाय्यक टेकचंद फेंडारकर यांनी शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आज गुरुवारला सकाळी ११ वाजता घडली.या प्रकरणामुळे नगरपरिषदेचे कर्मचारी वर्गात रोष असून सर्वा़नी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.पोलिसांनी शासकीय कामात व्यतय आणून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.