43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ नाल्यात वाहून गेलेल्या इसमाचे प्रेत आढळले

नाल्यात वाहून गेलेल्या इसमाचे प्रेत आढळले

0
28

आलापल्ली,दि.09 : आलापल्ली येथील आठवडी बाजारात गेलेला इसम घराकडे परत जात असतांना नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. दरम्यान कालपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असतांना नागेपल्लीजवळ त्याचा मृतदेह आज ९ ऑक्टोबर रोजी आढळून आला.
दिवाकर घोसाई सिडाम (४०) रा.मोद्दुमडगु ता.अहेरी असे मृतकाचे नाव आहे. काल दुपारी आठवडी बाजार करण्यासाठी मोद्दुमडगू येथून आलापल्ली येथे आला होता . बाजार करून परत जात असताना दिवाकर घोसाई सिडाम नाल्यातील पाण्यात वाहून गेला होता. अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत चामे, हवालदार संतोष पवार करीत आहेत.

blank