गडचिरोलीत ८८ ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरु होणार

0
104

गडचिरोली,दि.९: : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हयात ८८ ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरु करण्यास जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यानी मान्यता प्रदान केली आहे. ही खरेदी जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच आदिवासी विकास महामंडळ यांच्या वतीने करण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबरपासून खरेदीस प्रत्यक्षात सुरु होईल. शासनाने किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धानाला यंदा १५५० रुपये भाव निश्चित केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी योग्यवेळी धान खरेदी सुरु करण्यात येत आहे. याच नियोजनामुळे मागील हंगामात विक्रमी खरेदी होऊन शेतकऱ्यांना लाभ झाला होता.

कोरची तालुक्यातील कोरची, मसेली, बेतकाठी, मरकेकसा, बेडगाव, कोटरा, कुरखेडा तालुक्यातील रामगड, पुराडा, खेडेगाव, मालेवाडा, यंगलखेडा, कुरखेडा, आंधळी, कढोली, खरकाडा, गेवर्धा, नान्ही, देऊळगाव, गोठणगाव, सोनसरी, अंगारा, उराडी, आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल, देसाईगंज तालुक्यातील पिंपळगांव, विहीरगाव, गडचिरोली तालुक्यातील  मौशीखांब, धानोरा तालुक्यातील रांगी, मुरुमगाव, धानोरा, दुधमाळा, कारवाफा, पेंढरी, मोहली, चामोर्शी तालुक्यातील घोट, मक्केपल्ली, रेगडी, आमगाव, अडयाळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी, गिलगाव, अहेरी तालुक्यातील अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगूर, इंदाराम, उमानूर, आलापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, मुलचेरा तालुक्यातील लगाम, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद, रोमपल्ली, भामरागड तालुक्यातील भामरागड, लाहेरी, ताडगाव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर, कसनसूर, जारावंडी, गेंदा, कोठमी, हालेवारा अशा एकूण ८८ गावांमध्ये धान खरेदी केंद्र सुरु होणार आहेत.