गोंदिया जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू होणार

0
90

गोंदिया,दि.09 :दिवाळीपुर्वी जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुुरु करुन हलक्या प्रतीचा धान विकतांना लुबाडणूक होऊ नये यासाठी गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात शनिवारला झालेल्या बैठकीत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकिला जिल्हा मार्केटिंग अधिकारी अतूल नेरकर व आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक राजूरकर हजर होते.या बैठकीत धान खरेदीवर चर्चा करण्यात आली. सभेला  अधिकारी, खरेदी केंद्राचे संचालक उपस्थित होते.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी भागात १० केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळताच धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात ४३ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा एवढेच केंद्र आदिवासी विभागामार्फत सुरू केले जाणार आहेत. दरवर्षी धान खरेदी केंद्र उशीरा सुरू केले जात असल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपले धान व्यापाºयांना विकावे लागते. परंतु यंदा पावसाने दडी मारल्यामुळे फक्त काहीच शेतकºयांचे धान कापणीवर आले आहेत.