25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राष्ट्रीय देश बिहारमध्ये कोर्टाच्या आवारात स्फोट, २ ठार

बिहारमध्ये कोर्टाच्या आवारात स्फोट, २ ठार

0
25

बिहार, दि. २३ – बिहारमधील आरा येथील सिव्हिल कोर्टात स्फोट होऊन दोन जण ठार झाले आहेत. शुक्रवारी दुपारी हा स्फोट झाला असून त्यात एक महिला व पोलीस कॉन्स्टेबलसह दोन जण ठार तर ७ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कैद्यांना कोर्टांना हजर करताना हा स्फोट झाला. या स्फोटात ठार झालेली महिला बॅगमध्येच जिवंत बॉम्ब घेऊन जात होती. याप्रकरणी गृह मंत्रालयाने बिहार सरकारकडून अहवाल मागवला आहे