
गोंदिया,दि.2- सिकलसेल हा दुर्धर आजार असून, या रुग्णांसाठी शासनाने विशेष सवलती दिल्या आहेत. पण या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे अनेकदा स्वयंसेवी संस्थाच्यावतीने सांगण्यात आले आहे.राज्यात जवळपास 40 हजाराच्यावर रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण विदर्भातील नागपूर विभागात आढळतात.त्यातही गोंदिया जिल्हयात 9718 सिकलसेलचे वाहक असून 921 रुग्ण हे बाधित आहेत.त्यातही जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयात या रुग्णांच्या तपासणीची सोय केलेली असली तरी गेल्या एक महिन्यापासून सिकलसेल तपासणी किट उपलब्ध नसल्याचे प्रकरण समोर आले आहे.या कीटची खरेदी ही राज्यपातळीवर आरोग्य विभाग करीत असल्याने कीटची खरेदी होऊ शकली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.शाम निमगडे यांचे म्हणने आहे.त्या रुग्णांच्या तपासणीसाठी बपर सोलूशन प्रकियेचा वापर करण्यात येत असल्याचेही डाॅ.निमगडे यांचे म्हणने आहे.या प्रकियेमुळे दोन ते तीन दिवस तपासणीला लागतात,जेव्हा की कीटमुळे एकाच दिवसात तपासणी केली होते असे असतानाही राज्यशासन ही खरेदी करुन पुरवठा का करीत नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.




