सिकलसेल रुग्ण तपासणी किटचा जिल्हा रुग्णालयात अभाव

0
20

गोंदिया,दि.2- सिकलसेल हा दुर्धर आजार असून, या रुग्णांसाठी शासनाने विशेष सवलती दिल्या आहेत. पण या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे अनेकदा स्वयंसेवी संस्थाच्यावतीने सांगण्यात आले आहे.राज्यात जवळपास 40 हजाराच्यावर रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण विदर्भातील नागपूर विभागात आढळतात.त्यातही गोंदिया जिल्हयात 9718 सिकलसेलचे वाहक असून 921 रुग्ण हे बाधित आहेत.त्यातही जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयात या रुग्णांच्या तपासणीची सोय केलेली असली तरी गेल्या एक महिन्यापासून सिकलसेल तपासणी किट उपलब्ध नसल्याचे प्रकरण समोर आले आहे.या कीटची खरेदी ही राज्यपातळीवर आरोग्य विभाग करीत असल्याने कीटची खरेदी होऊ शकली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.शाम निमगडे यांचे म्हणने आहे.त्या रुग्णांच्या तपासणीसाठी बपर सोलूशन प्रकियेचा वापर करण्यात येत असल्याचेही डाॅ.निमगडे यांचे म्हणने आहे.या प्रकियेमुळे दोन ते तीन दिवस तपासणीला लागतात,जेव्हा की कीटमुळे एकाच दिवसात तपासणी केली होते असे असतानाही राज्यशासन ही खरेदी करुन पुरवठा का करीत नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्व सामान्यांना माहिती नसलेल्या थॅलेसिमिया, सिकल सेलसारख्या रुग्णांना बोन मॅरोची आवश्यकता असते. संपूर्ण देशात बोन मॅरोची आवश्यकता असलेले सुमारे साडे तीन हजार रुग्ण दरवर्षी नव्याने तयार होतात. एकट्या उत्तर नागपुरात बोन मॅरोची आवश्यक्ता असलेले सिकल सेलचे ४० हजार रुग्ण आहेत. या रुग्णांना दर 3 महिन्यात रक्त बदलवावे लागते त्यातील काही रुग्णांच्या प्रकृतीमुळे तर दर महिन्याला रक्त बदलण्याची वेळ येत असून त्यांच्यासाठी रक्तसाठा आरक्षित करुन ठेवण्यात आले असले तरी अनेकदा सिकलसेलच्या रुग्णांना रक्त मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत.सिकलसेल हा एक दुर्धर आजार आहे. हा आजार बाळ पोटात असते तेव्हापासूनच असतो. बाळ जन्माला येते त्या क्षणालाच सिकलसेल आजाराची व्याधी जडलेली असते. म्हणूनच दुःख जन्मालाच पुरले, असे दुःखाने म्हणावे लागते. शासनाने या रुग्णांना विशेष सवलती दिल्या आहेत. परीक्षेत एक मतदनीस, मोफत बससेवा, विनामूल्य रक्तपुरवठा आदी सुविधांचा त्यात समावेश आहे. पण या योजनांची अंमलबजावणी होतांना दिसत नाही