खा.पटोलेंची मृत शेतकऱ्याच्या कुटूबांला सांत्वना भेट

0
10

भंडारा,दि.03- भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील  किटकनाशक फवारणीमूळे जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. कांद्री येथील अल्पभूधारक शेतकरी प्रभु मोरांडे यांचा धानपिकावरील औषध फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता.या किटकनाशकांच्या औषधींबाबत व शेतकर्‍यांची होणारी फसवणूकीबाबत खासदार नानाभाऊ पटोले हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवित आहेत.परंतु सरकार डोळे मिटून बसली आहे. जिल्हाच्या दौऱ्यावर असताना खासदार पटोले यांनी मोरांडे परिवाराच्या घरी जाऊन भेट देत आपण तुमच्या व शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.