
गोंदिया,दि.०८: ओबीसी सेवा संघाच्यावतीने अमरावती जिल्ह्यातील पापड येथे राज्य अधिवेशनाचे आयोजन १० डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे राहणार आहेत. नागपूर विभागाच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घााटन होणार आहे. या अधिवेशनात कर्मवीर पुरस्काराने जेष्ठ विचारवंत नागेश चौधरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच डॉ. सिद्धेश्वर दोदंर, स्वप्नील वानखेडे, विपीन ईटनकर व विनोद येरणे या आयएएस अधिकाèयांचा सत्कार ही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे, जेष्ठ प्रबोधनकार जावेद पासा, डॉ. निशा शेंडे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शैलेंद्र वाघधरे, खुशाल ठाकरे, गजानन अहमदाबादकर, सरपंच विजय आजबले, सरपंच अशोक इंगळे, पवन जायस्वाल, डॉ. राजेश पांडे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता आयोजित संगठन कृती सत्र या विषयावरील चर्चासत्राचे अध्यक्ष प्रा. श्रावन देवरे राहणार असून वक्ते म्हणून सुनीता नेराडे, शिवाजी मारकर, भैयाजी लांबट, डॉ. नरेशचंद्र काठोडे, विष्णू गरुड, उल्हास जाधव, रत्नाताई सोनवने मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतरच्या संयुक्त विषय सत्रात इंजि. डी.ए.दळवी हे सत्राध्यक्ष राहणार असून इंजि. नितीन बुटी, प्रदीप वादापडे, बापू राऊत, लक्ष्मणराव दावणकर, सावन कटरे, लहू खामकर, ज्ञानेश्वर खराडे, अॅड. राजन दिक्षीत, डॉ. संजय कुंभार, दिपक निकम, वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




