25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ पोलिस महासंचालकांच्या हस्ते रिक्रिएशन हॉलचे उदघाटन

पोलिस महासंचालकांच्या हस्ते रिक्रिएशन हॉलचे उदघाटन

0
37

गडचिरोली,दि.09ः- महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतीश माथूर हे सोमवारी गडचिरोली जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांवरील मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी व क्रीडा कार्यक्रमांना वाव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या रिक्रिएशन हॉलचे उद््घाटन पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान पोलिस महासंचालक माथूर यांनी पोलिस मदत केंद्र गोडलवाही येथे भेट देऊन पोलिस जवानांशी संवाद साधला. त्यानंतर गडचिरोली येथील संकल्प शिबिर क्र. ८ ला भेट देऊन प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली.
पोलिस महासंचालक माथूर यांच्या हस्ते टवे व कोपश्री येथे झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीमध्ये अतिउत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक राजा आर., अप्पर पोलिस अधीक्षक हरी बालाजी, डॉ. आरती बंग तसेच इतर विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.