25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन

0
23

बुलडाणा,दि.11 : शेतकºयांच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले असून, शेतकर्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विद्युतची आवश्यकता असून सुद्धा त्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर जळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. शेतकºयांन वेठीस धरुन ट्रान्सफार्फर देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. म्हणून शेतकºयांच्या हितासाठी १० नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, मीश्कीन शहा, सैय्यद  जैरुद्दीन, आरीप शहा फरीद शहा, दिलीप वाघमारे, तुळशिदास इंगळे, बबन शिराळे, अमोल खंडारे, नंदु नवले, अरुण कुळकर्णी, मिलींद कुळकर्णी, उद्धव इंगळे, मोशीन शेख, दिपक सावजी, तेजराव जाधव यांच्यासह बरेच कार्यकर्ते उपस्थि होते.