24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा चामोर्शी तालुकास्तरीय मेळावा २७ नोव्हेंबरला

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा चामोर्शी तालुकास्तरीय मेळावा २७ नोव्हेंबरला

0
28

चामोर्शी,दि.12 : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी समाजाचा मेळावा  रोजी सायंकाळी ६ वाजता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ग्रामपंचायत रंगमंच येथे आयोजित केले आहे.ओबीसींचा लढा पुढे नेण्यासाठी व लोकजागृता निमार्ण करण्याच्या दृष्टीने आणि ओबीसी समाजाची जनगणना करून स्वतंत्र मंत्रालय केंद्रात स्थापन करावे , मंडल आयोग , नच्चीपन आयोग व स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू कराव्या , नॉन क्रिमिलेअर अट संपूर्ण ओबीसी समूहातून रद्द करावी , ओबीसी समाजातील विद्यार्थांना वसतिगृहाची तालुका स्तरावर व जिल्हास्तरावर उपलब्द करून घ्यावा , ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावा व गडचिरोली जिल्ह्यातील आरक्षण पुर्वरत करावा या मागनी सह हा मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्याचे उटघाटन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रुचित वांढरे यांच्याहस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड  महाराष्ट्र प्रदेश संघटक अमोल दादा मिटकरी आणि सेल्फ रीस्पेक्ट मुव्हमेंट चे मुख्य संघटक तथा ओबीसी फेडरेशन चे संयोजक बळीराजा धोटे  उपस्थित राहणार आहेत. तरीही जास्तीत जास्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते तथा ओबीसी समाजातील सर्व जातीय संघटना व ओबीसी समाजातील सर्व नागरिकांनी उपस्तीत राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष प्रा . दिनकर हिरादेवे ,आनंदरावर खरबनकर, प्रा रवींद्र इंगोले ,प्रा एन एस बोरकुटे ,श्री ओमप्रकाश झाडे , गोसाई खाडे ,राजू पोटवार , पंढरीनाथ ढुमने , प्रा बी के राठोड . प्रा रवी शास्त्रकार , प्रा डाँ.राज मुसने , प्रा उमाकांत तीवाडे ,विलास बोलगोडवार,राजेश्वर कुंदावार,बंडोपंत मल्लोलवार, सुरेश केळझरकर, रामगीरवार,निळकंठ येल्लुरे श्री मोहुर्ले,प्रा.सालुरकर,प्रा.संतोष राठोड,प्रा सचिन मुरकुटे यांनी केले आहे