नांदेड,दि.16 :तब्बल चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हैदराबाद-नांदेड-मुंबई या विमानसेवेस गुरुवार आज दि. 16 पासून उडान योजने अंतर्गत प्रारंभ झाला. यावेळी 55 प्रवाशी नांदेड येथून मुंबईकडे रवाना झाले. नांदेड -मुबई विमानसेवा मराठवाड्यातील काही जिल्ह्यासह विदर्भातील निकटच्या जिल्हातील प्रवाशांसाठी महत्वाची ठरणारी आहे.सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने उडान योजनेच्या माध्यमातून देशभरातील लहान विमानतळ जोडण्याचा निर्णय घेतला. यात नांदेडसह राज्यभरातील आठ विमानतळाचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात नांदेड- हैद्राबाद ही विमानसेवा सुरू झाली. मात्र धावपट्टीच्या कारणास्तव नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू झाली नव्हती. मागच्या पंधरा दिवसापासून धावपट्टीचे काम करण्यात आल्याने आज हैदराबाद-नांदेड-मुंबई ही विमास सेवा टूरु जेट कंपनीने सुरू केली आहे.
सकाळी दहा वाजता विमान आले, तर साडे दहा वाजता येथुन मुंबईच्या दिशेने भरारी घेतली. हे विमास मुंबई येथे दुपारी 12 च्या सुमारास पोहचणार आहे. तर तेथून उडून दुपारी दीड वाजता नांदेड येथे येणार आहे. यापूर्वी 2008 साली किंगफिशर कंपनीने विमानसेवा सुरू केली होती.त्यांनतर गो-एअर,स्पाइस जेट या कंपन्यांनी सेवा सुरू केली होती. आता टूरु जेट कंपनीने आजपासून सेवा सुरू केली अगदी कमी दरात. त्यामुळे विमान प्रवास सहजपणे सामन्याना परवडणारा ठरणारा आहे.
विमान सेवा वेळापत्रक
1) हैदराबाद ते नांदेड – 2) नांदेड ते मुंबई – 3) मुंबई ते नांदेड – 4) नांदेड ते हैदराबाद





