
गोंदिया,दि.18ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येत असलेल्या सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.विजय वानखेडे यांचा राज्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया(NSV) केल्याबद्दल नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात(दि.१६) सत्कार करण्यात आला.सोबतच त्यांना महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाची संधी मिळाली.या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याला देशात NSV चे ऊत्कृष्ठ कामकेल्याबद्ल स्मृतीचिन्ह डाँ.वंदना गुरूनानी Jt.Secretory.MOHF.Govt of India व डाँ.ए.के.सिकदर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया विभागाचे उपायुक्त यांच्या हस्ते देण्यात आले.हा पुरस्कार महाराष्ट्राचे प्रतिनिधी.डाँ.एन.डी.देशमुख,सह.संचालक.कु.क.महाराष्ट्र राज्य.
डाँ.सुनील मडावी,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी व डाँ.विजय वानखेडे,वै.अ.प्रा.आ.के.सातगांव (गोंदिया) यांनी संयुक्तरित्या स्विकारला.महाराष्ट्राने गेली दोनवर्ष या पुरस्कारामध्ये सातत्य राखले आहे.





