प्रा. श्याम मानवांचे 19 नोव्हेंबर ला गोंदिया येथे जाहीर व्याख्यान

0
21

गोंदिया,दि.18ः-अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीव्दारा राज्यभर सुरू असलेल्या संत गाडगेबाबा प्रबोधन अभियानाअंतर्गत संथागार, जिल्हा क्रीडा संकुल च्या समोर,मरारटोली, गोंदिया येथे रविवार दि. 19 नोव्हेंबरला साय. 6 वाजता वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयांवर अ. भा. अंनिसचे संस्थापक संघटक व PIMC, महाराष्ट्र शासनाचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांचे जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानात  खरे संत आणि ढोंगी बाबा कसे ओळखायचे? , स्त्रिया बाबांच्या नादी का लागतात? , सर्वच बाबा स्त्रियांचं लैगिक शोषण करतात का?,स्त्रियांना यातून वाचविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्यात काय तरतुद आहे?,या विषयांवर चमत्कार प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन होणार आहे. या व्याख्यानाला जनतेने खासकरून महिलांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.प्रकाश धोटे यांनी केले आहे.