गोंदिया,दि.१८ : महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे १९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ६.३० वाजता गडचिरोली येथून शासकीय वाहनाने गोंदियाकर्ड प्रयाण. सकाळी ९.३० वाजता गोंदिया येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक बांधकाम व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत.सत्तेत आल्यानंतर ना.पाटील यांचा तीन वर्षातील गोंदिया जिल्ह्याचा पहिलाच दौरा असून तो सुध्दा अवघ्या तीन तासात आटोपता घेणारा आहे.त्यामुळे तीन तासात बांधकाम विभागासह महसुलच्या किती समस्यांचे निराकरण करतात याकडे लक्ष लागले आहे. दुपारी १ वाजता गोंदिया येथून शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण करतील.




