26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनण्याचे निश्चित; 16 डिसेंबरला निवडणूक

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनण्याचे निश्चित; 16 डिसेंबरला निवडणूक

0
21

नवी दिल्ली,दि.20(वृत्तसंस्था) – सोनिया गांधींच्या निवासस्थानी 10 जनपथमध्ये सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आली. यात राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार, 16 डिसेंबरला निवडणूक होईल, यानंतर 19 रोजी निकालाची घोषणा होणार आहे. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

– सूत्रांनुसार, अध्यक्षपदासाठी राहुल गांधी एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीअंतर्गत पक्षाला 31 डिसेंबरपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. परंतु सूत्रांनुसार, 9 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. पक्षनेत्यांनी म्हटले की, अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी देण्यासाठी वर्किंग कमिटीची बैठक गरजेची नाही, परंतु सोनियांनी पक्षाशी निगडित निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च संस्थेकडून याला मंजुरी घेण्याचा निर्णय घेतला आहे.