बांधकाम मंत्री पाटील यांनी घेतली आमदार वाघमारेंची भेट

0
9

तुमसर,दि.20 -पुर्व विदर्भाच्या दौऱ्यावर रविवारला आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुमसर मोहाडी मतदारसंघाचे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन सुमारे दीड तास चर्चा केली. यावेळी बांधकाम व महसूल मंत्री  चंद्रकांत पाटिल साहेब यांचे भारतीय जनता युवा मोर्चा तुमसर शहर तर्फे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भंडारा जिल्हा भाजप अध्यक्ष तारीकभाऊ कुरैशी,अामदार चरण वाघमारे,नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे,शहर अध्यक्ष इंजि. गौरव नवरखेले यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तुमसर तालुक्यातील काही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्तांचा भाजप प्रवेश पाटिल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.तुमसर मतदारसंघातील विविध बांधकामाच्या विषयावर तसेच तुमसर नगरपरिषदेच्या कामकाजाविषयी चर्चा केली.मनोरा आमदार निवास भ्रष्टाचार प्रकरणी श्रीमती वाळके यांना निलंबित न केल्यामुळे बांधकाम विभागाची होणारी बदनामी,मलबार हिल येथील २२ कोटीचा भ्रष्टाचार(श्रीमती वाळके व हेमंत सावंत यांच्या कार्यकाळातील),मध्य मुंबई(साबां)विभाग येथील ए.जे. पाटील व अनिल कानिटकर यांचा ५० कोटीचा भ्रष्टाचार,बांद्रा शासकीय वसाहतीतल्या  सुमारे १०० कोटींचा भ्रष्टटाचाराचा ठपका असलेल्या अनिता परदेशी यावर आमदार वाघमारे यांनी केलेल्या तक्रारींची मुख्यमंत्री यांनी घेतलेली दखल. येणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बांधकाम विभागातील हे भ्रष्टाचार प्रकरण पुन्हा चर्चेत येणार असल्याने त्या मुद्याला घेऊन पाटील यांनी वाघमारेंशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे.