24.4 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ आढावा सभेत पीक विम्याला घेऊन सरपंच व पालकमंत्र्यात जुंपली

आढावा सभेत पीक विम्याला घेऊन सरपंच व पालकमंत्र्यात जुंपली

0
30

बीडीओ वक्तव्यावर उपसभापतीसह सरपंच गेले उठून
सडक अर्जुनी,दि.२५ः- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारला आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सडक अर्जुनी तालुक्यातील सरंपच व पालकमंत्र्यामध्ये पीक विमा योजनेला घेऊन चांगलीच बाचाबाची झाली.तर दुसरीकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लोकरे यांनी ही आढावा सभा सरपंचासाठी असल्याने पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य कुठलेच मुद्दे उपस्थित करु शकत नाही असे म्हणताच उपसभापती विलास शिवणकर हे आपल्या समर्थक सरपंचासह पालकमंत्र्याच्या उपस्थितीतच सभागृह सोडून गेल्याने चांगलीच खळबळ माजली होती.
सडक अर्जुनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात शुक्रवारला पंचायत समितीची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला पालकमंत्री राजकुमार बडोले,सभापती कविता रंगारी,उपसभापती विलास शिवणकर,गटविकास अधिकारी लोकरे,जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे,शिला पटले,रमेश चुèहे,यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.तसेच तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.blank सरपंच जिवन लंजे,दिनेश हुकरे आदी उपस्थित होते.शेतात पीक उभा असेल आणि अतिवृष्टी किंवा गारपीठमुळेच जर नुकसान झाले तरच तुम्हाला पिक विमाच्या लाभ मिळू शकेल असेल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी संबधित शेतकèयाच्या मुद्यावर माहिती दिली.बाम्हणीचे समाजसेवक माधव तरोणे यांनी हा मुद्दा उपस्थितीत केला होता.तेव्हा अनेक सरपंचानी त्यांचे समर्थन केले.घोटीच्या सरपंचानाही मुद्दा उपस्थित केला.त्यावर सरपंचानी पालकंत्र्यांना तुमचे सरकार व जिल्हाप्रशासन पिक विम्यासाठी गावागावात फिरले पिक विम्याच्या भरपाईचे कसे होणार असे विचारताच पालकमंत्र्यांनी हा संबधित विभागाचा प्रश्न असून निकषानुसार मोबदला मिळेल असे सांगत बाजू झटकण्याचा प्रयत्न केल्याने काही सरपंचांनी आक्षेप नोंदवत बाचाबाची झाल्याने वातावरण थोड तापले होते.मात्र नंतर शांत झाले.त्यातच गटशिक्षणाधिकारी सर्याम यांनीही चुकीची माहिती पालकमत्र्यांना दिल्याने पालकमंत्र्यांनी चांगलेच त्यांना धारेवर धरले.ग्रामसभा घेण्याचा अधिकारच नसल्याचे बीडीओ म्हणाल्याने नविन वाद निर्माण झाला आहे.

blank