40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादीच्यावतीने हल्लाबोल आंदोलनांतर्गत एसडीओंना निवेदन

राष्ट्रवादीच्यावतीने हल्लाबोल आंदोलनांतर्गत एसडीओंना निवेदन

0
24

गोंदिया,दि.27ः-  जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने रेलटोली स्थित कार्यालयात जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी गोंदिया यांना शासनाच्या विरोधात शेतकरीकर्जमाफी , महगाई , बेरोजगारी , विजदरवाढ़ , पेट्रोल,डीजल व गँस दर वाढ,रस्ते दुरुस्ती ,ओबीसी ची स्कालरशिप सुरु करणेसह इतर समस्याना हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.या सभेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीने सरकारच्या विरोधात यवतमाळ येथून सुरु करण्यात येत असलेल्या हल्लाबोल आंदोलनासंदर्भात जिल्हास्तरीय आढावा सभा घेण्याचे निर्देश होते,त्यानुसार हा मोर्चा काढण्यात आला.या हल्लाबोल मोर्च्यामध्ये जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, भंडारा डिस्टीक्ट अर्बन को आॅफ बॅंकेचे अध्यक्ष महेश जैन, जि.प. गट नेता गंगाधर परशुरामकर,महिलाअध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,प्रदेश महासचिव मनोहरराव चंद्रिकापुरे,ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रभाकर दोनोडे,युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर तरोणे,केतन तुरकर,शिव शर्मा,नानू मुदलीयार,पंचम बिसेन,कैलास पटले,राजेश तुरकर,अविनाश काशीवार,डाॅ.विनोद पटले,प्रेम रहागंडाले,संजीव,दुर्गाबाई तिराले,सुखराम फुंडे,मनोहर वालदे, सह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.