गडचिरोली,दि.01ः- ‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ निर्माण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करा या मागणीकरीता गुरुवारला गडचिरोली येथील शेकडोंच्या संख्येत विदर्भवादी घंटानाद आंदोलन करीत रस्त्यावर उरतले. मात्र या घंटानाद आंदोलनाला खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी आंदोलनाला पोलिसांच्या वतीने थांबविण्यात आले. त्यामुळे सदर घंटानाद आंदोलन खा. नेते यांच्या कार्यालयापर्यंंत पोहोचू शकला नाही. याबाबत विदर्भवादी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सदर घंटानाद आंदोलनाला स्थानिक इंदिरा गांधी चौकातून करण्यात आली. मात्र चामोर्शी मार्गावर विदर्भवाद्यांच्या घंटानाद आंदोलना पोलिस विभागाच्यावतीने थांबवून जिल्हा परिषद शाळेत वळता केला. त्यामुळे सदर आंदोलन खा. नेते यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकला नाही. गडचिरोली -चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खा. अशोक नेते यांच्या कार्यालयावर घंटानाद आंदोलन करून त्यांनी दिलेले आश्वासन कधी पूर्ण करणार याचा जाब विचारणाकरिता ‘देता की जाता’ असा सवाल आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.
या मोर्चाचे नेतृत्व मुख्य निमंत्रक रामभाऊ नेवले, ज्येष्ठ नेते माजी आ. वामनराव चटप यांनी. या आंदोलना रंजना मार्मडे, नितीन भागवत, अरूण पा. मुनघाटे, राजेंद्रसिंग ठाकूर, जगदीश बोंद्रे, रमेश अप्पलवार, शालीक नाकाडे, चंद्रशेखर भडांगे, अशोक पोरेड्डीवार, नामदेव गडपल्लीवार, गुरूदास भोपये, एजाज शेख, बाळू मडावी, मनिषा सज्जनपवार, सोनाली पुण्यपवार, वामनराव जुआरे, रघुनाथ तलांडे, मनिषा दोनाडकर, वसंत राऊत, दादाजी चुधरी, देवराव म्हशाखेत्री, घुसू पा. खुणे, क्रिष्णकांत मुनघाटे, सुधाकर डोईजड, चोखा धानोरकर आदी विदर्भवादी नेतेमंडळीसह शेकडोच्या संख्येच्या कार्यकर्ते व सामान्य नागरीक उपस्थित होते.





