37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार – मुख्यमंत्री

फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार – मुख्यमंत्री

0
29

अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे हत्या प्रकरण
मुंबई, दि. 5: खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. यामुळे फितुर साक्षीदारांवरील कार्यवाहीसाठी राज्य सरकार अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. याशिवाय या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
खर्डा या कर्जत तालुक्यातील गावात नितीन आगे या 17 वर्षीय युवकाची हत्या  करण्यात आली होती. या प्रकरणातील 9 संशयितांची अहमदनगर न्यायालयाने  नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. 26 पैकी 13 साक्षीदार फितूर झाल्याने
सबळ पुराव्याअभावी त्याचा निकालावर प्रतिकूल परिणाम झाला.  या पार्श्वभूमीवर नितीन यांचे वडील राजू आगे यांनी दि. 4 डिसेंबर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी  खासदार अमर साबळे सुद्धा  उपस्थित होते.

blank