मलकापूर येथे दोन स्वतंत्र नियमित न्यायालये

0
6

मलकापूर (जि. बुलढाणा), दि.06 येथे कार्यरत जिल्हा व अतिरिक्त सत्र
न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोड न्यायालयांऐवजी
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशी
दोन स्वतंत्र न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करण्यास आज झालेल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्वतंत्र न्यायालयांमुळे या
तालुक्यातील नागरिकांची सोय होणार असून न्यायप्रक्रिया गतिमान होणार आहे.