25.9 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home शैक्षणिक विद्यापीठातर्फे कल्याणी मेश्राम सुवर्ण पदकाने सन्मानित

विद्यापीठातर्फे कल्याणी मेश्राम सुवर्ण पदकाने सन्मानित

0
56

गोरेगाव,दि.6ः- नागपूर-रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या १0४ दीक्षांत समारंभात माहिती तंत्रज्ञान शाखेतून नागपूर विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवून कल्याणी वसंत मेश्राम ही विद्यार्थीनी  गोल्ड सुवर्णपदकाची मानकर ठरली.
कल्याणीही आमगाव येथील रहिवासी असून नागपूर विद्यापीठांतर्गत येणार्‍या नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कवि कुलगुरु अभियांत्रिकी महाविद्यालय येथे माहिती तंत्रज्ञान शाखेत अध्ययनरत आहे. दरम्यान, या दिक्षांत समारंभात अखील भारतीय तंत्र परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, कुलसचिव पुरणचंद मेर्शाम यांच्या हस्ते कल्याणीला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या सुवर्णपदकासाठी कल्याणीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.