गोंदिया,दि.७ : पाण्यासंदर्भातील योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पाण्याचा वापर नियोजनपूर्वक व काटकसरीने करण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. यादृष्टीने राज्यात कायमस्वरुपी जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जलकर्मी, जलप्रेमी आणि तालुकास्तरावर जलदूत या स्वयंसेवकासाठी आपले अर्ज १५ डिसेंबरपर्यंत कार्यकारी अभियंता, गोंदिया पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात आणून दयावेत.
जलकर्मी निवडीसाठी शासनाच्या तसेच शासनास सहाय्यकारी संस्थामधील स्वयंप्रेरणेने जलसाक्षरतेचे काम करणारे तसेच इच्छुक असणारे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, वन, महसूल, कृषि, जलसंधारण, जलसंपदा, पर्यावरण या विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कृषि आयुक्तालय, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा या विभागात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांची यासाठी निवड करण्यात येईल.
जलप्रेमी हा संबंधित जिल्ह्यात राहणारा सज्ञान असावा. कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. संगणकीय संपर्काचे ज्ञान आवश्यक. प्रवास सुक्ष्मनिरीक्षण व निरिक्षणाचे विश्लेषण तसेच निष्कर्षात्मक मांडणी करण्याची आवड असणारा, जलविषयक शासकीय/अशासकीय/समाजसेवी संस्थांशी संबंधित प्रशिक्षक असल्यास प्राधान्य. जलसंधारणाबाबत पुरेशे ज्ञान. सिंचन प्रकल्पाची रचना, धरण व कालव्याचे संरक्षण याबाबत ज्ञान, निवडीमध्ये महिलांना प्राधान्य, जलक्षेत्रातील कामकाजाचा अनुभव आणि चांगले चारित्र्य असणे आवश्यक आहे.
जलदूत या तालुकास्तरीय पदासाठी काम करणार व्यक्ती हा त्या तालुक्यातील असावा. शक्यतो १२ वी किंवा पदविका उत्तीर्ण, संगणकीय संपर्काचे ज्ञान आवश्यक. सुक्ष्मनिरिक्षण व निरिक्षणाचे विश्लेषण, निष्कर्षात्मक मांडणी करण्याची आवड असणारा, जलविषयक, शासकीय/अशासकीय/समाजसेवी संस्थांशी संबंधित प्रशिक्षक असल्यास प्राधान्य. जलसंधारणाबाबत पुरेशे ज्ञान. सिंचन प्रकल्पाची रचना, धरण व कालव्याचे संरक्षण याबाबत ज्ञान, निवडीमध्ये महिलांना प्राधान्य, जलक्षेत्रातील कामकाजाचा अनुभव आणि चांगले चारित्र्य असणे आवश्यक आहे. तरी या पदास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी १५ डिसेंबरपर्यंत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती तथा कार्यकारी अभियंता, गोंदिया पाटबंधारे विभाग, गोंदिया यांच्याकड अर्ज करावे.





