गोंदिया,दि.07ः-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिनी गोंदियाच्या भीमघाटावरील मिनी चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी भीमसागर उसळला. हजारो आंबेडकरी अनुयायांनी डॉ. आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
येथील पांगोली नदीवर स्थित भीमघाट हा मिनी चैत्यभूमी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही हजारो भीमसैनिक गर्दी करीत असतात. यंदाही हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. तेव्हा अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुंभारीनगर, रेल्वे वॉर्ड, बहुजन समाज पक्ष, लोकशाही आघाडी आदी संघटनाच्या वतीने भोजनदान, फळवाटप, सरबत वाटप करण्यात आले. महापरिनिर्वाणदिनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अनिल सुखदेवे, सुनील केलनका, सुरेंद्र खोब्रागडे, कुंदा भास्कर, विनोद मेर्शाम, के.टी. गणवीर, अजित मेर्शाम, किरण फुले, जे.एम. खोब्रागडे, धीरज मेर्शाम, महेंद्र कठाणे, अँड.ए.बी. बोरकर, किशोर मेर्शाम, छाया दसरे, लक्ष्मीकांत डहाट, सत्यशोधक प्रबोधनकार, शुद्धोधन सहारे, विशाल शेंडे, सुरेंद्र खोब्रागडे, अशोक गुप्ता, चंद्रशेखर सुखदेवे, सुशीला भालेराव, प्रज्ञा डोंगरे आदी आंबेडकरी अनुयायांनी मिनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
मिनी चैत्यभूमीवर होणार्या गदीर्मुळे कोणत्याही प्रकारे अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ म्हणून बुद्धिस्ट समाज संघाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यासोबतच आंबेडकरी अनुयायांना पिण्याकरिता ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान सकाळी १0 वाजता शहरातील आंबेडकर चौकातील डॉ.बासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध संघटनेच्या पदाधिकार्यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
पांगोली नदीच्या काठावर असलेला स्मृतिस्तंभ तिथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी विदर्भातील जनतेच्या र्शद्धेची मिनी चैत्यभूमीच झाली आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबई येथे बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी छोटा गोंदियाचे अर्जुन गजभिये, कुंडलिक बडगे, कस्तुरबा वॉर्डातील वीर वामनराव गजभिये, फत्तू नागदेवे, तुलाराम, शामकुंवर, बाबूराव बोबांर्डे, चरणदास कठाणे, तानबा बन्सोड गेले होते. त्यांनी मुंबईतून आणलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अस्थी मातीच्या कलशात ठेवून कस्तुरबा वॉडार्तून जुलूस काढला होता. हे अस्थिकलश छोटा गोंदिया जवळील पांगोली नदीच्या काठावर पुरण्यात आले. तिथे स्मृतिस्तंभ तयार करण्यात आला आणि हा परिसर भीमघाट म्हणून प्रसिद्ध झाला. येथे मागील ६१ वर्षापासून महापरिनिर्वाणदिनी हजारो आंबेडकरी अनुयायी येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहतात. हा परिसर मिनी चैत्यभूमी म्हणून नावारूपास येत आहे.





