23.9 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ शिक्षक भारतीचे विभागीय उपायुक्तांना निवेदन

शिक्षक भारतीचे विभागीय उपायुक्तांना निवेदन

0
20

नागपूर,दि.08ः- शिक्षक भारती संघटनेच्यावतीने 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये, दुर्गम भागातील टांडा ,पाड्या, टोल्यावरील विध्यर्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये या संदर्भातील मागण्याचे निवेदन  शिक्षण मंत्री विनोद तावड़े यांना नागपूर विभागाचे उपायुक्त संजय धिवरे यांच्यामार्फत देण्यात आले.निवेदन देताना शिक्षक भारतीचे विभागीय कार्यवाह दिलीप तडस, राज्य संघटक संजय खेडीकर,अध्यक्ष नागपुर शहर सपन नेहरोत्रा, नरेंद्र बोबडे ,( चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष), महेंद्र सोनवणे (गोंदिया जिल्हा अध्यक्ष ),श्री.बडवाईक (भंडारा जिल्हा कार्यवाह) प्रकाश बाम्हणकर,(विभागीय अध्यक्ष प्राथ.) सुरेश डांगे (विभागीय कार्यवाह प्राथ.)रावण शेरकुरे,पायपरे,,अशरफ अली तसेच सर्व सहा जिल्हातील जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

blank