
गोंदिया,दि.१३: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभााच्यावतीने मुर्री येथे १० कोटी रुपये निधीचा वसतिगृह मंजूर झाला आहे. यासाठी मुर्री ग्रामपंचायतीने जागा ही दिली होती. परंतु जी जागा देण्यास आली आहे ती जागा तलाव बोडीची असून या जागेवर तलाव अथवा बालोद्यान करण्यात यावे व वसतिगृहाचे बांधकाम आश्रगशाळा अथवा लाल पहाडी जवळ असलेल्या शासकीय जागेत करण्यात यावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून या बाबतची माहिती मुर्री ग्रामपंचायत येथे आयोजित पत्र परिषदेत दिली. पत्र परिषदेला सरपंच हेमंत येरणे, उपसरपंच संदीप टेंभरे, ग्रा.््पं.सदस्य ओमप्रकाश रहांगडाले, तिर्थराज रहांगडाले, पुष्पा शरणागत, मिना लटये, मिना सूर्यवंशी, सुनंदा जांभुळकर, रामेश्वर खोमचे, पूजा गिरेवार, परमानंद शहारे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
गोंदिया शहरात शिक्षण घेण्यासाठी विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती व अपंग प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्याथ्र्यांचा निवाèयाचा व भोजनाचा प्रश्न सुटावा यासााठी गोंदिया जवळील मुर्री येथे २५० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह मंजूर झाले असून निधीही प्राप्त झाला आहे. या वसतिगृहाचे बांधकाम तातडीने वेळेत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले होते. शासकीय वसतिगृह व निवासी शाळांसाठी जमीन संपादनाचा आढावा बैठकीत जि.प. सदस्य शैलज सोनवाने यांनी वसतिगृहाच्या प्रस्तावित बांधकाम जागेला घेऊन विरोध दर्शविला होता. परंतु प्रशासनाने त्याच जागेवर वसतिगृह बांधण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे. तसेच केवळ विरोध करुन बांधकाम थांबविणे अत्यंत चुकीचे आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक इथले वसतिगशह मंजूर करुन घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्त लावून वसतिगृहाचे काम सुरु करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले होते. परंतु प्रस्तावित जागा ही तलाव बोडी असून गावात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मध्यभागी हा एकच तलाव असून यावर बांधकाम केल्यास भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच त्या जागेवर खोलीकरण करुन व परिसरात सौंदर्यीकरण करुन ग्रामस्थांना करमणूक करण्यासाठी चांगली जागा आहे. ही जागा जर वसतिगृहासाठी दिली तर गावात त्याचे विपरित परिणाम पडण्याची शक्यता असल्याने ही जागा बदलून दुसèया ठिकाणी वसतिगृहाचे बांधकाम करण्यात यावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यापुर्वीच्या सन २०१२ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाèयांनी ग्रामसभा घेऊन ती जागा प्रस्तावित केली होती. परंतु जागेचे महत्व बघता सद्या ती जागा देणे उचित नसल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांनी त्या जागेला विरोध केला आह. तेव्हा प्रशासन या विषयी काय भूमिका घेते? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.