शौचायल बांधकाम जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ

0
8

गोंदिया,दि.१३-वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम व्हावे, त्याचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत एलईडी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून ११ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एच. ठाकरे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी. कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश अंबुले, विश्वजित डोंगरे, गोंदिया पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आर.व्ही. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक तथा जिल्हा परिषदचे सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यातील साडेतीनशे गावात एलईडी व्हॅनच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत विविध चित्रफिती दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. याच चित्रफितीतून शेतपिकांवर लागणाèया विविध रोंगावर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद््घाटनानंतर एलईडी व्हॅन गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा, दांडेगाव, तिरोडा, तालुक्यतील बेरडीपार, खुश्रीपार, भजेपार आणि आमगाव तालुक्यातील गोरठा धावडीटोला, ठाणा या गावात जनजागृती करणार असून उपक्रमाचा गावकèयांनी लाभ घेवून वैयक्तीक शौचालयाचा वापरावर भर देण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एच. ठाकरे यांनी केले आहे.