
गोंदिया,दि.14ः-. गोंदिया तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत मजीतपुर येथे १३ डिसेंबर रोजी आमसभेचे आयोजन सरपंचा नंदनी नंदकिशोर आंबेडायरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले होते.ज्या मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षांची निवड बलराज कोहचडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक राजेश बावनकुळे, उपसरपंच भुवनलाल भगत , ग्राम पंचायत सदस्या वैशाली आंबेडायरे, सविता बिसेन,सिमा उईके,जयवंता उईके, ग्राम पंचायत सदस्य विनोद कोडवती, शैलेश येरकडे, हेमंत बघेले व गावकरी सुनिल सोनेवाने, नंदकिशोर आंबेडायरे, यशवंत भलावी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोहचडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय राजेशकुमार तायवाडे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त संघटना जिल्हा गोंदिया सचिव श्रावण बरियेकर, हमजा शेख, सुरेश भगत, विनोद बरेकर,चुन्नीलाल बिसेन,व गावकर्यांना दिले.





