अप्रेंटिस संघटनेच्यावतीने शुक्रवारला विधानभवनावर मोर्चा

0
11

भंडारा,दि.14ः- महाराष्ट्र राज्य अॅप्रेनटीस युनियन इंटक जिल्हा शाखा भंडाराच्यावतीने महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सह पत संस्था भंडारा येथील कार्यालयात श्यामकिशोर वंजारी (झोनल अध्यक्ष गोंदिया इंटक) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नागपूर हिवाळी अधिवेशनावर अप्रेंटिसांच्या विविध मागण्यांना घेऊन 15 डिसेबरला मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले.या मोर्च्याला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे विचार सभेत व्यक्त करण्यात आले.सभेला दिगंबर कटरे (महासचिव म.रा.अॅप्रेनटीस युनियन ),अजय दरभे (भंडारा सर्कल उपाध्यक्ष इंटक),विश्वजीत मेंढे (झोनल सहसचिव इंटक गोंदिया),महिला प्रतिनिधी रंजना उपवंशी ,कमल खांदाडे  उपस्थित होते.दिगंबर कटरे यांनी अप्रेनटिस युनियन इंटकचा इतिहास,संघटनेने वेळोवेळी केलेल्या आन्दोलनाची माहिती दिली.तसेच संघटनेच्या माध्यमातून अप्रेंटिसांच्या बाजूने निघालेली परिपञके,तिन्ही कंपनीत नोकर भरती करताना शिकाऊ उमेदवारांवर झालेला अन्याय,वयाच्या जाचक मर्यादांमुळे नोकरी पासून वंचित उमेदवार ,चुकिची शैक्षणिक पात्रता,चालू अप्रेंटिस उमेदवारांचे प्रश्न व 15 डिसेंबरच्या नागपूर विधानसभेवरील युनियनच्या मोर्च्याबद्दल माहिती दिली.आमदार भाई जगताप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विज कामगार फेडरेशन इंटक यांच्या माध्यमातून बेरोजगार अप्रेंटिसउमेदवारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन श्यामकिशोर वंजारी यांनी दिले.नागपूर येथे आयोजित मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रविण वासनिक (सचिव गोंदिया),धर्मेंद्र ठाकुर (उपाध्यक्ष गोंदिय)यानी केले.

यावेळी भंडारा जिल्हा कार्यकारीणीचे गठण करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष-रोहित चंद्रीकापुरे,उपाध्यक्ष मंगेश राऊत,उपाध्यक्ष -कु पिरती चोपकर,सचिव -आशिष जावुडकर,सहसचिव- रितेश नशीने,सहसचिव- आकांक्षा मेश्राम,कोषाध्यक्ष -योगेश निमबेकर,जिल्हा संघटक नितीन रहांगडाले (तुमसर),प्रविण कुंभरे(भंडारा),निलेश खोब्रागडे(साकोली),प्रफुल्ल हर्षे(पवनी),रजत खोब्रागडे,किरण पवनकर (मोहाडी),महिला प्रतिनिधी कु. प्रियंका बावनकर,पुजा धारगाये,आरजू मडावी ,कार्यकारिणी सदस्य
जितेश मेश्राम,रोशन लिलहारे यांचा समावेश आहे.