27.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home विदर्भ शिवसेनेच्या प्रयत्नाने उद्यापासून गोंदिया-नागपूर शिवशाही बससेवा

शिवसेनेच्या प्रयत्नाने उद्यापासून गोंदिया-नागपूर शिवशाही बससेवा

0
33

गोंदिया,दि.23 : राज्याचे परिवहन मंत्री व पुर्व विदर्भ शिवसेनेचे संपर्क मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी भंडारा येथून सुरु केलेली शिवशाही बससेवा गोंदिया येथूनही सुरु करण्यासंबधीचे निवेदन भंडारा येथील शिवशाहीच्या उदघाटनप्रसंगी दिले होते.त्या निवेदनाचा पाठपुरावा सातत्याने सुरु ठेवत नागपूर हिवाळी अधिवेशन काळात शिवहरे यांनी सोमवार 18 डिसेंबरला पुन्हा परिवहन मंत्र्याकडे हा विषय रेटून धरला असता परिवहन मंत्र्यांनी गोंदियातून शिवशाही बससेवा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला.शिवहरे यांचे निवेदन आणि  सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनीही  भाजपच्या कार्यकर्त्याकडून शिवशाही बससुरु करण्यासंबधीची विनंती करण्यात आल्याने त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता.त्या प्रयत्नाना यश आले असून गोंदिया ते नागपूर ही शिवशाही वातानुकुलीत बससेवा उद्या २४ डिसेंबरपासून गोंदिया आगारातून सुरू होत आहे.यासाठी दोन बसेस गोंदिया आगारात गुरुवारलाचा दाखल झाल्या असून शिवसेनेच्या नेत्यांनी त्या बसचे स्वागतही केले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बससेवाचा शुभारंभ होणार आहे. सदर बसफेरी ही गोंदिया येथून सकाळी ८.४५ वा व ११ वाजता सुटणार असून, दिवसातून गोंदिया-नागपूर-गोंदिया अशा दोन फेर्‍या दररोज होणार असून भविष्यात गोंदिया-शिर्डी ही शिवसाही बससेवा परिवहन मंत्री रावते यांच्या प्रयत्नाने सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी देत ना.रावते यांचे अभिनंदन व आभार मानले आहे.