22.4 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home विदर्भ आ. देशमुखांचे नोटीसला उत्तर नाही

आ. देशमुखांचे नोटीसला उत्तर नाही

0
25

नागपूर,दि.26ः-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगळ्या विदर्भाची आठवण करून देणारे पत्र लिहून भाजपला घरचा अहेर देणारे व संघाच्या बौद्धिकला दांडी मारणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी नोटीसला अद्याप उत्तर दिलेले नाही. विदर्भाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिले आहे.
राज्यात सत्ता परिवर्तनानंतर सुरू झालेल्या पायंड्यानुसार भाजपचे सर्व मंत्री व विधिमंडळातील सदस्य हिवाळी अधिवेशन काळात रेशीमबागेतील स्मृती ​मंदिरास भेट देऊन दर्शन घेतात. तसेच, बौद्धिकदेखील होते. बौद्धिकला हजेरीसाठी पक्षाकडून व्हिप जारी करण्यात येतो. त्यामुळे सर्वांना आवर्जून हजेरी लावणे बंधनकारक होते. मात्र, काही महत्त्वपूर्ण काम किंवा पूर्वसूचना देऊन गैरहजर राहण्याची मुभा आहे. त्यामुळे हजेरी लावणे शक्य नसलेल्या सदस्यांनी मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना आधीच कळवले.