विजय रुपाणी, नितीन पटेलांसह 20 मंत्र्यांचा शपथविधी

0
7

अहमदाबाद,दि.26(वृत्तसंस्था) – गुजरातमध्ये भाजपानं सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. मंगळवारी (26 डिसेंबर) विजय रुपाणी यांनी गांधीनगर येथे दुस-यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुजरातमधील भाजपा सरकारचा शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहीत  भाजपा व ‘रालोआ’ घटकपक्षांचे 18 मुख्यमंत्री उपस्थित होते
रुपाणी यांच्या नवीन मंत्रिमंडळात जुन्या तसंच नवीन चेह-यांसहीत 20 जणांना संधी देण्यात आली आहे.

विजय रुपाणी यांनी दुस-यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी यांनी शपथ घेतली आहे. रुपाणी यांनी दुस-यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 2006-2012 या कालावधीदरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते

यांनी घेतली शपथ..

कॅबिनेट मंत्री

विजय रुपाणी –मुख्यमंत्री

नितीन पटेल –उपमुख्यमंत्री

आर.सी. फलदू –सौराष्ट्रातील लेवा पटेल समाजाचे नेते.

भुपेंद्र चुडासमा –अहमदाबादच्या ढोलकातील आमदार आहेत. राजपूत समाजाचे असून पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत.

कौशिक पटेल –नाराणपुरा येथील आमदार, अमित शहा यांचे नीकटवर्तीय

सौरभ पटेल –सौराष्ट्रातील नेते, कडवा पटेल समुदायाचा चेहरा असून आनंदीबेन यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते.

गणपत वसावा –

जयेशभाई रादडिया –रादडिया आधीच्या सरकारमध्येही मंत्री होते. पोरबंदरचे खासदार विठ्ठल भाई यांचे पुत्केर. जेतपूरमधून निवडून आले आहेत. पाटीदार असून तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत.

दिलीप ठाकूर –पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. ओबीसी नेते असून पाटणच्नया चणास्मा मतदारसंघातून विजयी.

ईश्वर परमार –दलित नेते असून बारडोलीमधून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.

राज्यमंत्री

प्रदीपसिंह जाडेजा –उत्तर गुजरातचे राजपूत नेते असून चौथ्यावेळी आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या सरकारमध्येही मंत्री होते.

परबत पटेल

पुरुषोत्तम सोलंकी –पाचव्यांदा आमदार बनलेले सोलंकी यापूर्वीच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. कोळी समाजाचे नेते असून, भावनगर ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

बचूभाई खाबड –तिसऱ्यांदा आमदार बनलेले ओबीसी नेते आहेत. मध्ये गुजरातचे मोठे नेते असल्याने गेल्या मंत्रिमंडळातही समावेश होता.

जयद्रथ परमार –मध्य गुजरातचे ओबीसी नेते आहेत. हलोलमधून चौथ्यावेळी आमदार बनले आहेत. कायद्याचे जाणकार आहेत.

ईश्वरसिंह पटेल –दक्षिण गुजरातचे नेते आहेत.गेल्या सरकारमध्येही मंत्री होते. भरूचच्या अंकलेश्वरमधून चौथ्यावेळी निवडून आले आहेत.

वसन अहिर –कच्छचे अहिर समाजाचे नेते. अंजारमधून पाचव्यांदा आमदार.

विभावरी दवे –सौराष्ट्रमधील ब्राह्मण नेत्या आहेत. रुपाणी सरकारमधील एकमेव महिला चेहरा. भावनगर पूर्वमधून तिसऱ्यांदा आमदार बनल्या.

रमणलाल पाटकर

किशोर कानाणी –दक्षिण गुजरातमधील पाटीदारांचा मोठा चेहरा. सूरतच्या वराछामधून दुसऱ्यांदा विजयी

या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या सोहळ्यास १८ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. आजवर कोणत्याही शपथविधी सोहळ्यास इतक्या मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांची कधीच उपस्थिती नव्हती. याशिवाय, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रातील मंत्र्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.