23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ 10 फेब्रुवारीला राष्ट्रीय लोकअदालत प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची संधी

10 फेब्रुवारीला राष्ट्रीय लोकअदालत प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची संधी

0
28

गोंदिया,दि.16 : जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय, तसेच जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यांच्या वतीने सर्व तालुका न्यायालयामध्ये 10 फेब्रुवारी 2018 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्ट कलम 138, बँक रिकव्हरीची केसेस, मोटार वाहन अपघात प्राधिकरणाची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादनाची, दिवाणी प्रकरणे जसे- भाडे, बँक वसुली, प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बिलाची (चोरीची प्रकरणे सोडून) इत्यादी तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे.
तरी ज्या पक्षकारांना आपली दाखल प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात 24 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणाकरीता सर्व बँकांनी, संबंधितांनी किंवा अर्जदारांनी सुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे किंवा तालुका विधी सेवा समितीकडे 21 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा. सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तात्काळ निकाली काढून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव इशरत शेख यांनी केले आहे.