झांजियात २० जानेवारीपासुन मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
6

गोरेगाव दि :-१६:- युवा क्रिडा संघ क्रिकेट क्लब झांजिया च्या वतीने तीन दिवसीय ता २० जानेवारीपासुन २२ जानेवारीपर्यत मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पांगोली क्रिकेट मैदानात करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उदघाटन चंद्रशेखर ( गुड्डु) बोपचे यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्ष स्थानी पी जी कटरे हे राहणार आहेत उपाध्यक्ष म्हणुन राहुल कटरे, दिप प्रज्वलक डेविड राऊत राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच उषा दिहारी, उपसरपंच मंगला चव्हाण, पोलीस पाटील तोमेश कोहळे, सुदाम राऊत,ओमकार शरणागत,अरुण बिसेन,प्रदीप जैन व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी उपस्थित होणार आहेत.प्रथम पुरस्कार ५ हजार ५५५ रुपये, व्दितीय पुरस्कार ३ हजार ३३३ रुपये  व इतर पुरस्कार ठेवण्यात आलेले आहेत.बक्षीस वितरण समारोह ता २२ जानेवारीला होणार असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपंचायत उपाध्यक्ष इंजी आशिष बारेवार व उपाध्यक्ष म्हणुन माजी सैनिक , हवालदार सहाय्यक दुय्यम निरीक्षक  उपस्थित होणार आहेत.तर बक्षीस वितरक सरपंच ऊषा दिहारी, माजी सैनिक,शिक्षक सुरजलाल कोल्हारे यांच्या हस्ते होणार आहे.या मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी व्यकंट बिसेन, कमलेश पंधराम, डिलेश तिवारी, पंकज साठवणे, सुभम पटले प्रयत्नशिल आहेत.