24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home Top News जिल्ह्यातील आश्रमशाळांची विदारक स्थिती

जिल्ह्यातील आश्रमशाळांची विदारक स्थिती

0
500

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.१८ः-महाराष्ट्र विधानमंडळच्या अनुसूचित जमाती कल्याण समिती उद्यापासून १८ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीत जिल्ह्याच्या दौèयावर येत आहे. विधानसभा सदस्य डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश आहे. या समितीकडून जिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी विकासाच्या योजनांची पाहणी करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे समितीच्या कार्यक्रमात आदिवासी आश्रमशाळांसह वस्तीगृहांच्या भेटीचा सुध्दा उल्लेख आहे.
जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत २४ खासगी व १३ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जात आहेत.सोबतच काही नामाqकत शाळामध्ये मुलांना शिक्षण दिले जात आहे.त्यांच्यासाठी एका मुलामागे ५० हजार रुपये वर्षाला दिले जात आहेत. शिक्षणापासून वंचित राहणाèया घटकांना शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी आश्रमशाळांची संकल्पना पुढे आली.विशेष करून आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यामध्ये शासकीय व खासगी आश्रमशाळा उभ्या राहिल्या.त्यात हजारो विद्यार्थिनी शिक्षणही घेत आहेत.अनेकांनी अशा शाळांमध्ये शिक्षण घेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.मात्र अलीकडे आश्रमशाळा म्हणजे विद्याथ्र्यांनीच्या भावनांशी खेळण्याचे ठिकाण असल्याचे चित्र गेल्या काही वर्षातील विविध घडामोडींवरून बघावयास मिळते.विशेष म्हणजे नागरिाकंच्या चर्चेनुसार सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मोठ्याप्रमाणात अनियमितता असून लैंगिकप्रवृत्तीच्या घटंनाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.सोबतच या आश्रमशाळेतील निधीच्या खर्चावरही शंका व्यक्त केली जात असून काही महिन्यापुर्वी तर विद्याथ्र्यांनी मुख्याध्यापक दारु पिऊन राहत असल्याची तक्रारही केली होती.याच आश्रमशाळेतील विद्याथ्र्यांना एकदा जेवनातून विषबाधा झाली होती. अळ्या झालेल्या जून्या पेठातून पोळा तयार करण्यात आल्या होत्या. त्या पोळ्या खाल्यामुळे विद्याथ्र्यांना मळमळ होऊन विद्याथ्र्यांना विषबाधा झाली होती.परंतु आजही काही परिस्थितीत बदल झाला नसून तीच परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

शाळा व्यवस्थापन समिति व पालक समितीच्या सदस्यांनी शाळेत जाऊन पाहिल्यावर आश्रमशाळेत अनेक असुविधा असून स्वयंपाक गृहकाचे नालीतच सीळे अन्न फेकले जाते.शौचालयाची दुर्गंधी येत होती. वस्तीगृहातील विद्युत उपकरणे लोंबकळत होते. त्यामुळे विद्युतचा शॉक विद्याथ्र्यांना कधी ही बसू शकतो हे नाकारता येत नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी अस्वच्छ होती.अभ्यासाकडे पुर्ण दुर्लक्ष असून अजूनही अभ्यासक्रम अपुर्ण असल्याची तक्रार आहे.सोबतच याच शेंडा आश्रमशाळेसाठी नवीन इमारत तयार केल्यानंतर जुनी इमारत ही ओसाड पडली असून त्या ईमारतीमध्ये गैरप्रकार होत असल्याचे सुज्ञ नागरिकाचे म्हणने आहे.
आश्रमशाळांमधील गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश असले तरी जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लागल्याचे चित्र नाही. जिल्ह्यातील मकरधोकडा येथील मुलीवर चौकीदाराने केलेल्या अत्याचारामुळे व आधीच्या सर्पदंशप्रकरणाने ही शाळाच बंद केली. पिपरिया (जि. गोंदिया) येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे प्रकरण सुध्दा काही महिन्यापुर्वीचेच,तिरोडा तालुक्यातील मेंढा येथील आश्रमशाळेला अद्यापही सुरक्षाqभत नाही.मजीतपूर येथील आश्रमशाळेत विद्यार्थी आजही उघड्यावरच कपडे धुतात आंगोळ करतात अशीच स्थिती बहुतांश शाळामधली आहे.तर शेंडामधील झोपण्याचे साहित्यही मोडकळीस आलेले आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा ‘राम-भरोसेङ्क आहे.शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमध्ये महिला अधीक्षकांची पदे मंजूर असून त्यांची भरतीही करण्यात आलेली नाही.blank

सफाई कर्मचारी नसल्याने शाळांमधील शौचालये व बाथरूम हे मुलीनांच स्वतःस्वच्छ करून घ्यावे लागत असल्याचेही चित्र आश्रमशाळांमध्ये आहे.शेंडा,पुराडा, मजीतपूरची शासकीय आश्रमशाळा असो की जमाकुडोची अव्यवस्थेचे चित्रण आहे.पुराडा येथील आश्रमशाळेत तर आजही मुले जमिनीवरच झोपत असल्याचे वृत्त आहे.
अनेक शाळांमध्ये निवासगृहांचे दरवाजे, खिडक्या कडी-कोयंडा नसल्याने नीट बंद होत नाहीत. स्नानगृहांची स्थिती तशीच. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी मुलांसमवेत स्त्री अधीक्षिका वा अन्य महिला कर्मचारी नसतात.विद्यार्थिनी झोपत असलेल्या खोल्यांची दारे व खिडक्या नीट बंद होत नसल्याने मुली असुरक्षित आहेत.आश्रम शाळांतील आदिवासी विद्याथ्र्यांना सर्पदंश, आजार, विषबाधा, दूषित पाणी, निकृष्ट आहार व पुरेशा सोयी सुविधा अभावी कित्येक विद्याथ्र्यांचा मृत्यू होतो. आश्रम शाळांमध्ये शाळा संहितेचे पालन होत नाही, सानुग्रह अनुदान मिळूनही विद्याथ्र्यांना सोयी सुविधा दिल्या जात नाही.विद्याथ्र्यांना फळे, दूध कधीच मिळत नाही.भात, भाजी, पोळी देण्याचे प्रावधान आहे. मात्र विद्याथ्र्यांना पोळी कधीच दिसत नाही.अंडे व मटण हे महिन्यातून एखाद्यावेळी मिळाले तर ठीक.

प्रत्येक विद्याथ्र्यीनीला स्वतंत्र ताट, स्वतंत्र अंथरूण, पांघरून द्यायचे असते. मात्र अंथरूण, पांघरूणची व्यवस्था अनेक खासगी व शासकीय आश्रमशाळांमध्ये नाही. २० विद्याथ्र्यामागे एक शौचालय, बाथरूम असायला हवे, परंतु अशी सोय अनेक आश्रमशाळांमध्ये नाही.बहुतांश आश्रमशाळांमध्ये अशुद्ध पिण्याचे पाणी मिळते.बहुतांश शाळांमध्ये थंड पाण्यानेच विद्याथ्र्यांनीना अंघोळ करावी लागत असल्याचे जमाकुडोच्या आश्रमशाळेत बघावयास मिळाले.आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्र्यांनीना रात्री भगवान भरोसे सोडून जबाबदार कर्मचारी मुख्यालयातून गायब राहत असल्याची धक्कादायक बाब जमाकुडो आश्रमशाळेत उघडकीस आली होती.जमाकुडो येथील आश्रमशाळेत १६७ मुली शिक्षण घेत आहेत.मुलीसांठी असलेल्या शौचालयात घाणीचे साम्राज्य तर अपुèया पलंगामुळे विद्यार्थिनीवर खालीच बेडवर झोपण्याची वेळ आलेली आहे.७० ते ८० मुली या गेल्या दोन चार वर्षापासून खालीच झोपत असून त्यांना अद्यापही पलंग उपलब्ध करून दिलेले नाही.अशाप्रकारची अव्यवस्था प्रत्येक शाळेचीच आहे.ही समिती खरोखरच या शाळांचे भाग्य बदलविण्यासाठी काही करते की शासकीय दौरा म्हणून आटोपून जाते याकडे बघावे लागणार आहे.

blank