40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप

0
26

blank

अर्जुनी मोरगाव,दि.२१ : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते २१ जानेवारी रोजी नवेगावबांध येथे आयोजित एका कार्यक्रमात अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. वत्सला मारगाये, सुषमा मारगाये, सरीता तुलावी, चंद्रकला सांगोळे, शकुंतला काळसर्पे, नेहा बरैय्या, पदमा नेवारे, सरीता दुधकवर, सरीता मेश्राम, शालु कोवे, निता लाडे या लाभार्थी महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयाचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

blank