23.9 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home मराठवाडा/खान्देश जिल्हा ग्राहक परिषदेवर प्रदिप कोकडवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

जिल्हा ग्राहक परिषदेवर प्रदिप कोकडवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

0
65

जिंतुर,दि.२२ः-परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर जिंतुर येथून व्यापार उद्योग क्षेत्रातुन पत्रकार तथा व्यापारी महासंघा चे उपाध्यक्ष प्रदिप सोपनराव कोकडवार यांची निवड जिल्हाधिकारी शिवा शंकर यांच्या अध्यक्षते खालील समितित झाली आहे तसे आदेश नुकतेच काढण्यात आले.
ना सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारिश नुसार परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद वर जिंतुर तालुका व्यापारी महासंघा चे उपाध्यक्ष तथा पत्रकार श्री प्रदिप सोपनराव कोकडवार यांची व्यापार उद्योग क्षेत्रातुन अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयत अप्पर जिल्हाधिकारी माअंकुश पिनाटे यांच्या हस्ते कोकडवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हाभरातून 23 सदस्य नियुक्त करण्यात आले असून जिंतुर येथून ग्राहक संघटनेचे गुलाबराव शिंदे यांची पण निवड करण्यात आली आहे.
सर्व प्रथम एस टी प्रवासी ग्राहकांच्या अडचणी विषयी लक्ष घालनार असे कोकडवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या निवडी बद्दल माजी नगराध्यक्ष सखाराम चिद्रवार,ब्रिजगोपाल तोषनीवाल,रमेश दरगड,सुनील तोषनीवाल,संजय कोकडवार, अकबर सिद्धिकी यांच्या सह अनेकांनी केले आहे