केंंद्रातील मोदी सरकार देशातून लोकशाही संपुष्टात आणण्याचा तयारीत – माजी खासदार पटोलें 

0
10
गोंदिया, दि.२२ः- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशातून लोकशाही संपुष्टात आणण्यांची तयारी करीत असून आरक्षणावर गदा आणायची तसेच संविधानात बदल करण्याची भाषा ही दिवसेंदिवस होत आहे. अश्यातच सर्वसामान्यांनाचा मताधिकार चा हक्क सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना राहणार की नाही याची ही भीती वाटत असून नोटबंदी पूर्वी सर्वसामान्यांचे उघडण्यात आलेले जनधनच्या खात्यांमुळे देशात सर्वात मोठा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसला,वेगळया विदर्भा बाबत राज्याचे अर्थमंत्री राज्यात बहुमत आल्यानंतर विचार करूची भाषा करतात ,जीएसटी लागू करण्याकरिता बहुमत मिळतो मात्र वेगळया विदर्भाबाबत बहुमत नाही,लोकांना दिलेल्या आश्वासनातील तीळमात्र ही पुर्ण करू न शकलेली ही सरकार शेतकरी सह सर्वसामान्यांच्या विरोधी सरकार असून फक्त देशातील धनाढयांचा विचार करणारी सरकार असल्याचा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी  बुधवारला गोंदियातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या प्रसंगी कॉग्रेस पक्षाचे नामदेव किरसान, अ‍ॅड. के.आर.शेंडे, विशाल अग्रवाल,नगरपरिषद बांधकाम सभापती शकील मंसूरी, जि.प.सभापती रमेश अंबुले,काँग्रेस जिल्हा महासचिव अमर वराडे, गोेरेगाव बाजार समितीचे संचालक एॅड.पी.सी.चव्हाण,विशाल शेंडे,मलेशाम येरोला,आवेशपोठियावाला,चिकू अग्रवाल,अशोक इटनकर आदी उपस्थित होते.  पुढे बोलतांना पटोले म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस ,केंदियमंत्री नितीन गडकरी ,राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पगारी कर्मचा-यांसारखे वर्तन करतात. मुख्यमंत्री फडणवीस हे तर नुसते घोषणाबाज  असून नुकतेच मॅगनेटीक महाराष्ट करीता १२ लाख कोटीची घोषणा केली. मागील वर्षी मॅक इन महाराष्ट च्या नावावर ४०लाख कोटीची घोषणा केली होती. मात्र यातील एक पैसाचाही काम यांच्याकडे दाखविण्याकरिता नाही. नागपूर शहरात तर विकास पागल झाला असून येथे निर्माणाधीन ओव्हरब्रिज ,पक्के रस्ते तोडून नविन निर्माण कार्य करण्यात येत असून  पुढील काळात आपण नागपूर मेट्रो त ३०० कोटीचा घोटाळा आपण उघडकीस आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी आपण धुळे जिल्हयात जावून मुख्यमंत्री फडणवीस विरोधात एफआयआर दाखिल केली आहे. केंद्रातील सरकारची प्रत्येक योजनांची पूर्तता आता २०२२ ला होणार असल्याचे योजनेच्या प्रत्येक नावात योजना चा कार्यकाळ २०२२ पर्यंतचा करण्यात आला आहे. आपण या सरकाला यांची जागा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांत दाखवून देवू ,खासदारकीच्या राजीनाम्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतांना जनतेत यांच्याविषयी असलेला राग मला कडून आला आहे. आता त्याचे रूपांतर फक्त मतात करण्याची वाट असल्याचेही नाना पटोले याप्रसंगी म्हणाले.