24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home गुन्हेवार्ता लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले

लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले

0
30
वाशिम,दि 23 :-मंगरूळपीर येथील ग्रामसेवकाला मृत्यूची नोंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहात अटक केली.मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोळंबी येथे कार्यरत ग्रामसेवक जीवन त्र्यंबक शिंदे याने तक्रारदाराला वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यात करिता १०००/-  रुपये लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामसेवक त्र्यंबक शिंदे याला रंगेहात अटक केली. शिंदे विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्रीमती नाशिककर, पोलीस उप अधिक्षक गांगुर्डे ,पो.हा. परळकर,इंगळे,पो.ना.राठोड,तवलारकर यांच्या पथकाने केली.