42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता सीआरपीएफ जवानाने झोपेत झाडल्या गोळ्या, दोन जवान जखमी

सीआरपीएफ जवानाने झोपेत झाडल्या गोळ्या, दोन जवान जखमी

0
34

गडचिरोली,दि. ७: केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने आपल्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्याने दोन जवान जखमी झाल्याची घटना काल(दि.६)रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एटापल्ली येथील जीवनगट्टा मार्गावरील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली. संघपाल विलास मारोती व एन.इंगळे अशी जखमी जवानांची नावे आहेत. संजय शेंद्रे असे आरोपी जवानाचे नाव आहे.प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सीआरपीएफ कॅम्पमधील जवान भोजन करुन झोपले होते. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास संजय शेंद्रे नामक जवानाने आपल्या बंदुकीतून संघपाल विलास मारोती व एन.इंगळे यांच्यावर गोळ्‌या झाडल्या. यात संघपालच्या पोटाला, तर इंगळे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. संघपाल हे गंभीर जखमी आहेत. दोघांनाही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना नागपूरला नेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी या तीन जवानांमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे वैमनस्यातून एकाने हा गोळीबार केल्याची चर्चा आहे. मात्र, तपासाअंती सत्य उघडकीस येईल. पोलिसांनी आरोपीस अटक केली किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

blank