31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News चंद्राबाबूंनी घेतला सरकार सोडण्याचा निर्णय, भाजपने गमावला मित्र

चंद्राबाबूंनी घेतला सरकार सोडण्याचा निर्णय, भाजपने गमावला मित्र

0
24

अमरावती,दि.08(वृत्तसंस्था) – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने (टीडीपी) केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी चंद्राबाबू विधानसभेत म्हणाले, टीडीपीने केंद्रीय तर भाजपच्या मंत्र्यांनी राज्य सरकारमधून राजीनामा दिला आहे. भाजपच्या मंत्र्यांनी राज्यात चांगले काम केले. त्यासाठी त्यांना धन्यवाद. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यानंतर बुधवारी रात्री केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा चंद्राबाबूंनी निर्णय घेतला होता. ते म्हणाले, केंद्राने आमचा अपमान केला आहे. केंद्र सरकारकडे अनेकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. परंतू केंद्र सरकारने त्यावर कधीही सकारात्मक विचार केला नाही. गुरुवारी आमचे दोन्ही मंत्री केंद्र सरकारचा राजीनामा देतील.