35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता विद्यार्थिनींशी अश्लील चाळे ; मुख्याध्यापकावर गुन्हा

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे ; मुख्याध्यापकावर गुन्हा

0
22

तुमसर,दि.२६ : तालुक्यातील गोबरवाही येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर मुख्याध्यापक फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.
गोबरवाही येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय दयाराम साठपणे हा मागील एक वर्षापासून शालेय विद्यार्थिनींशी अश्लिल चाळे करीत असल्याची तक्र ार मुलींनी पालकांकडे केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाची तक्र ार शाळा व्यवस्थापन समितीकडे करण्यात आली. तक्र ारीची दखल गटशिक्षणाधिकार्‍यांनी घेत शाळेत जाऊन चौकशी केली.दुसरीकडे, काही राजकीय तथा सामाजिक कार्यकर्त्यांनीही पोलिसांत तक्रार केली होती. अखेरीस बुधवारी गोबरवाही पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक विजय साठवणे याच्याविरोधात भादंविच्या कलम ३५४ (१) व (२) तथा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

blank