24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home राजकीय अ‍ॅड.विरेंद्र जायस्वाल सोमवारला भरणार उमेदवारी अर्ज

अ‍ॅड.विरेंद्र जायस्वाल सोमवारला भरणार उमेदवारी अर्ज

0
20

गोंदिया,दि.04 : भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीकरिता पक्षाकडे उमेदवारी मागितली असून सोमवार 7 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अ‍ॅड. जायस्वाल यांच्यासोबतच भंडारा येथील मच्छिमार संघाचे नेते प्रकाश मालगाये हे सुध्दा आपला उमेदवारी अर्ज सोमवारलाच दाखल करणार आहेत.भाजपने अद्यापही आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नसली तरी सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकृत भाजप उमेदवाराचे नामांकन 9 मे रोजी दाखल होणार आहे.