36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता इर्री येथे सरपंच पतीकडून शिपायाला मारहाण 

इर्री येथे सरपंच पतीकडून शिपायाला मारहाण 

0
26

blank

गोंदिया,दि.दि.७:- तालुक्यातील इर्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असलेल्या शिपायाला सरपंच पतीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.४) इर्री येथे घडली. रमेश ठकरेले (रा. इर्री) असे जखमी शिपायाचे नाव आहे.
रमेश ठकरेले कार्यालयात काम करीत बसले असताना येथील सरपंच दुर्गा मेंढे यांचे पती लखन मेंढे आपला सहकारी रेखलाल नागपुरे याच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयात आले. मी सांगितलेले काम का करीत नाही असे म्हणून त्यांनी शिपाई रमेशला धक्काबुक्की केली. मारहाणीत रमेशच्या डोक्याला जखम होऊन रक्तंबबांळ झाला.त्याला तत्काळ केटीएस जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालया दाखल करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. सरपंच पतीवर तत्काळ कारवाई करून ग्रामपंचायत परिसरात बंदी करण्यात यावी, अशी मागणी इर्री येथील नागरिकांनी व जिल्हा परिचर संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. ग्रामपंचायत परिचर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देऊन दोषीवर त्वरीत कारवाईची मागणी केली आहे.

blank