ओबीसी नेत्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

0
10
जिल्हाधिकाèयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर,दि.७: ओबीसी नेते व अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव qलगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवून निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे सोलापूर येथे शुक्रवारी मराठा आरक्षणाबाबत सुनावनी घेण्यात आली होती. त्यावेळी ओबीसी नेते व अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव qलगे हे आयोगासमोर निवेदन देण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यांना निवेदन देण्यास मज्जाव करुन त्यांच्यावर शाई फेकून कपडे फाडण्यात आले. या घटनेचा ओबीसी महासंघातर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच या कृत्याचा निषेध करीत ज्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यापुढे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे घेण्यात येणाèया सुनावनी दरम्यान सर्व ओबीसी निवेदनधारकांना व ओबीसी नेत्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवासी जिल्हाधिकाèयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देणाèया शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, प्रवीण चवरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव वानखेडे, अरुण तिखे, अमोल चवरे, इंगोेले, सचिन भिलकर, तसेच ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.